Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Drosera burmanii’ in Marathi
‘Drosera burmanii’ चा मराठी अर्थ
शब्द: Drosera burmanii
उच्चार: ड्रॉसेरा बर्मानी
अर्थ: एक कीटकभक्षी वनस्पती
अधिक माहिती: ड्रॉसेरा बर्मानी ही एक कीटकभक्षी वनस्पती आहे. जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने इ.स. 1737 मध्ये श्रीलंकेत या वनस्पतीचा शोध लावला होता. त्यांचे नाव या वनस्पतीला देण्यात आले आहे. या वनस्पतीची रचना फुलासारखी असते ज्याची पाने गुलाबी, लाल रंगाची, आकर्षक असतात. पानांच्या कडांना बारीक केसतंतू असतात. या केसतंतूंवर चिकट द्रवाचे बिंदू असतात. या वनस्पतींकडे आकर्षित झालेले किटक या चिकट द्रवांमुळे अडकून बसतात. हे अडकलेले कीटक वनस्पतींद्वारे स्त्रवलेल्य रसायनांद्वारे विघ्टित केले जातात व त्यातील पोषक तत्वे वनस्पती शोषून घेते.