Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pericardial cavity’ in Marathi
‘Pericardial cavity’ चा मराठी अर्थ
शब्द: Pericardial cavity
उच्चार: पेरिकार्डिअल कॅव्हिटी
अर्थ: हृदयावरणांदरम्यानची पोकळी
अधिक माहिती: मानवी हृदयाभोवती दुपदरी आवरण असते त्याला पेरिकार्डिअम/ हृदयावरण असे म्हणतात. हृदयावरणाच्या दोन स्तरांमध्ये पोकळी असते तीला पेरिकार्डिअल कॅव्हिटी असे म्हणतात. या पोकळीमधे एक द्रवपदार्थ असतो, ज्याला पेरिकार्डिअल फ्लुइड किंवा सेरस फ्लुइड असे म्हणतात. या द्रवपदार्थामुळे हृदयाचे घर्षण व धक्क्यांमुळे इजा होण्यापासून संरक्षण होते.