Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Double fertilization’ in Marathi
‘Double fertilization’ चा मराठी अर्थ
शब्द: Double fertilization
उच्चार: डबल फर्टिलायझेशन
अर्थ: द्विफलन
अधिक माहिती: परागकणातील (पोलन ग्रेन) दोन नरयुग्मक (मेल गॅमेट) पैकी एक नरयुग्मक हे अंडपेशी (एग सेल) शी संयोग पावते आणि युग्मनज (झायगोट) तयार होतो, याला पहिले फलन असे म्हणतात. दुसरे फलन हे दुसर्या नरयुग्मकाचे दोन ध्रुवीय केंद्राकांशी संयोग पावल्याने होते. पहिल्या फलनामुळे भ्रूण तयार होतो तर दुसर्या फलनामुळे भ्रूणपोष (एंडोस्पर्म) तयार होतो. अशाप्रकारे दोन पुंयुग्मकांद्वारे होणार्या दोन स्वतंत्र फलनंना Double Fertilization किंवा द्विफलन असे म्हणतात.