Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Distribution of electron’ in Marathi
‘Distribution of electron’ चा मराठी अर्थ
शब्द: Distribution of electron
उच्चार: डिस्ट्रिब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन
अर्थ: इलेक्ट्रॉनचे विविध कक्षा/कवचांमधे वितरण
अधिक माहिती: निल्स बोर यांनी मांडलेल्या अणुप्रारूपानुसार अणुकेंद्रकाभोवतीचे इलेक्ट्रॉन हे विविध स्थिर/स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. या कवचांची विशिष्ट ऊर्जा पातळी असते जी त्या कवचांच्या क्रमांकावर अवलंबून असते. कवचाचा क्रमांक त्याच्या केंद्रकापासूनच्या क्रमावर अवलंबून असतो. या विविध कवचांच्या क्रमांकासाठी ‘n’ ही संज्ञा वापरतात. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच (n=1), त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच (n=2) असे म्हणतात. n ही 1, 2, 3, अशाप्रकारे असू शकते. n = 1, 2, 3, 4, … या क्रमांकानुसार कवचांना K, L, M, N,…. ह्या संज्ञांनी संबोधण्यात येते. उदा. पहिले कवच K (n=1), त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच L (n=2) अशाप्रकारे. जसे ‘n’ चे मूल्य वाढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते. प्रत्येक कवचात विशिष्ट संख्येइतकेच इलेक्ट्रॉन सामावू शकतात. प्रत्येक कवचाची ही जास्तीत जास्त संख्या 2n² या सूत्राने मिळते ज्यात n हा त्या कवचाचा क्रमांक आहे. या सूत्रानुसार मूलद्रव्यच्या अणुसंखेतील इलेक्ट्रॉन पहील्या कवचात 2, दुसऱ्या कवचात 8, तिसऱ्या कवचात 18 अशा प्रकारे सर्व कवचांत वितरित होतात.