Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Dewar flask’ in Marathi
‘Dewar flask’ चा मराठी अर्थ
शब्द: Dewar flask
उच्चार: ड्यूआर फ्लास्क
अर्थ: थंड पदार्थ थंड व गरम पदार्थ गरम राहण्यासाठी वापरला जाणारा (थर्मास फ्लास्क) डबा.
अधिक माहिती: सर जेम्स ड्यूआर या स्कॉटिश वैज्ञानिकाने प्रथम तयार केलेला थर्मास फ्लास्क. या डब्यात बाहेरच्या संरक्षक आवरणात एकात एक बसवलेल्या काचेच्या निर्वात केलेल्या सीलबंद नळ्या असतात ज्यांच्या पृष्ठभागावर उष्णतेचे प्रारण परावर्तित करण्यासाठी चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केलेले असतात. या रचनेमुळे आतील उष्णतेची पातळी स्थिर राहते.