Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Dalton’s atomic theory’ in Marathi
‘Dalton’s atomic theory’ चा मराठी अर्थ
शब्द: Dalton’s atomic theory
उच्चार: डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी
अर्थ: डाल्टनचा अणुसिद्धांत
अधिक माहिती: अणू कशाचा बनलेला असतो या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी इ.स. 1803 मध्ये हा सिद्धांत मांडला. ह्या सिद्धांतात त्यांनी असे सांगितले आहे की अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात व द्रव्य हे अणूंचे बनलेले असते. डाल्टनच्या मतानुसार अणू हा एखाद्या कडक, भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला व आतील वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असणारा असा असतो. डालटनच्या सिद्धांतानुसार एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात व त्यांचे वस्तुमान एकसमान असते तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान भिन्न असते.