Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Cuscuta’ in Marathi
‘Cuscuta’ चा मराठी अर्थ
शब्द: Cuscuta
उच्चार: कुस्कुटा
अर्थ: अमरवेल
अधिक माहिती: Cuscuta किंवा Dodder ही एक परपोषी वनस्पती आहे जी इअर वनस्पतींवर त्यांचे अन्न शोषून वाढते. अमरवेल वनस्पतीचे शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यां सारख्या खोडांचे जाळे असते. अमरवेल वनस्पतीला पान किंवा प्रकाशसंश्लेषी अवयव नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही. त्यांमूळे ही वनस्पती अन्नासाठी host plant किंवा आधारक वनस्पतींच्या खोडांतून पोषकद्रव्ये शोषून घेते. यासाठी अमरवेलीमधे haustoriam किंवा चूषक मुळे असतात. चूषक मुळे आधारक वनस्पतींच्या रसवाहिन्या, जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात व अन्न, पाणी शोषून घेतात.