Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘CT scan’ in Marathi
‘CT scan’ चा मराठी अर्थ
शब्द: CT scan
उच्चार: सीटी स्कॅन
अर्थ: शरिरांतर्गत भागातील क्ष-किरण कापचित्र /छेदचित्रे मिळवणे
अधिक माहिती: Computerized tomography scan म्हणजेच CT scan तंत्राचा वापर करून शरीराच्या आतील भागांचे कापचित्र /छेदचित्र मिळवता येते. या यंत्रामधे ठेवलेल्या व्यक्तीच्या शरिराभोवती गोलाकार फिरणार्या क्ष-किरण यंत्राचे संगणकाद्वारे नियंत्रण करुन शरीरातील अवयव, स्नायू, रक्तवाहिन्या, हाडे इत्यादिंचे तपशील दाखवणारी क्ष-किरण छेदचित्रे मिळवता येतात.