Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘COVID’ in Marathi
‘COVID’ चा मराठी अर्थ
शब्द: COVID
उच्चार: कोव्हिड
अर्थ: करोना विषाणूच्या संसर्गामुळे होणारा आजार
अधिक माहिती: COVID हे COrona VIrus Disease चे संक्षिप्त रूप आहे. कोव्हिड हा आजार करोना व्हायरस सार्स-कोव्ह-2 या विषाणूच्या संसर्गामुळे होतो. या विषाणूचा प्रसार हवेतून, खोकला, शिंका तसेच संसर्ग असलेल्या वस्तू किंवा व्यक्तीला स्पर्श झाल्यास होतो. COVID हा श्वसनमार्गाचा संसर्ग असून गंभीर संसर्गामधे रूग्णाच्या फुप्फुसांना हानी पोहोचवतो. ताप, कोरडा खोकला, थकवा ही COVID ची सर्वात जास्त आढळनारी सुरुवातीची लक्षणे आहेत. तर कमी प्रमाणात अंगदुखी, घसा सुजने, हगवण, डोळे लाल होणे, डोकेदुखी, वास व चव घेण्याची क्षमता जाणे, त्वचेवर चट्टा येणे ही लक्षणे दिसून येऊ शकतात. गंभीर स्वरूपातील रूग्णांमधे श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे, छातीत दुखने, छातीवर दाब आल्यासारखे वाटणे, बोलणे व हालचाल बंद होणे ही लक्षणे आढळतात. COVID संसर्गाचे निदान हे RT-PCR चाचणी किंवा ॲंटिजेन टेस्ट द्वारे केले जाते. चाचणीचे निष्कर्ष संसर्ग असल्याचे दर्शवित असल्यास वैद्यकिय सल्ल्याने उपचार घ्यावेत.