Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Corona testing’ in Marathi
‘Corona testing’ चा मराठी अर्थ
शब्द: Corona testing
उच्चार: कोरोना टेस्टिंग
अर्थ: कोरोना विषाणूचे संक्रमण झालेले आहे की नाही यासाठी चाचणी करणे
अधिक माहिती: या चाचणीचे सिरोटेस्टिंग, ॲंटिजेन टेस्टींग व आरटी-पीसीआर हे प्रकार आहेत. सिरो टेस्टिंग ही रक्तचाचणी आहे. या चाचणीमधे रुग्णाच्या शरीरात विषाणूच्या विरोधात बनविलेली प्रतिपिंडे (antibodies) बनलेली आहेत का हे शोधले जाते. विषाणूचे संक्रमण झालेल्या व विषाणू संक्रमनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तामधे प्रतिपिंडे आढळतात. या चाचणीचे निष्कर्ष विश्वासार्ह मानले जात नाहीत. ॲंटिजेन टेस्टिंग मधे रुग्णाच्या नमुन्यामधे विषाणूंच्या प्रथिनांचे अस्तित्व शोधले जाते तर आरटी-पीसीआर (RT-PCR) मधे विषाणूची आरएनए जनुकिय सामग्रीचे अस्तित्व शोधले जाते.