Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Conservation of biodiversity’ in Marathi
‘Conservation of biodiversity’ चा मराठी अर्थ
शब्द: Conservation of biodiversity
उच्चार: कन्झर्व्हेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी
अर्थ: जैवविविधतेचे संवर्धन
अधिक माहिती: biodiversity किंवा जैवविविधता म्हणजे एखाद्या इकॉसिस्टिम मधे आढळणाऱ्या सजीवांमधील विविधतेचे प्रमाण. पर्यावरणीय स्थिरता राखण्यासाठी जैवविविधता असणे आवश्यक असते. लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात वाढल्यामूळे पृथ्वीवरील नैसर्गिक स्त्रोतांचा वापर प्रचंड वाढला आहे. यामुळे कमी होणारे वनक्षेत्र, वाढलेले प्रदूषण यामुळे जैवविविधतेचे प्रमाण चिंताजनक दराने कमी झाले आहे. Conservation म्हणजेच संवर्धन मध्ये सजीवांच्या नैसर्गिक अधिवासांची हानी कमी करणे, हानी थांबविणे किंवा हानी ची प्रक्रिया उलट फिरवण्याचा प्रयत्न करणे हे समाविष्ट आहे. जैवविविधता ही एखाद्या इकॉसिस्टिम मध्ये स्टॅबिलिटी राखण्यास मदत करते. एखाद्या प्रकारचा जीव नष्ट होणे हे संपूर्ण इकोसिस्टम वर वाईट परिणाम करू शकते. त्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन करणे आवश्यक आहे.