Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Conjoined twins’ in Marathi
‘Conjoined twins’ चा मराठी अर्थ
शब्द: Conjoined twins
उच्चार: कॉंजॉइन्ड ट्विन्स
अर्थ: सयामिज जुळे, एकमेकांना जोडलेले जुळे, शरीराचा काही भाग एकमेकांना जोडलेले जुळे
अधिक माहिती: गर्भातील भ्रूणपेशींची वाढ होत असतान जर भ्रूणपेशींची विभागणी/ दोन भागात विभाजन जर युग्मज (झायगोट) तयार झाल्यापासून 8 दिवसांनंतर झाली तर ते विभाजन अपूर्ण असण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी अपूर्ण विभाजन झालेल्या भ्रूणापासून सायामिज जुळे जन्माला येतात. Conjoined twins म्हणजे अशी जुळी मुले ज्यांमधे शरीराचा काही भाग एकमेकांना जोडलेला असतो किंवा दोन्ही जुळ्यांमधे सामायिक असतो (म्हणजे काही अवयव दोन्ही जुळ्यांमधे सामायिक असतात). या प्रकारच्या जुळ्यांना Siamese twins (एकमेकांना जोडलेले जुळे) असेही म्हणतात.