Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Compression Only Life Support (COLS)’ in Marathi
‘Compression Only Life Support (COLS)’ चा मराठी अर्थ
शब्द: Compression Only Life Support (COLS)
उच्चार: कॉम्प्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट
अर्थ: हृदयविकारा्चा झटका आल्यास रुग्णाच्या छातीवर वारंवार दाब देऊन प्राण वाचवण्याची पद्धत
अधिक माहिती: हा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वैद्यकिय मदत मिळेपर्यंत रुग्णाला दिला जाणारा प्राथमिक उपचार आहे. यात रूग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासले जाते. रूग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून रूग्णाच्या छातीवर छातीच्या बरोबर मध्यभागी शास्त्रशुद्ध पद्धतीने वारंवार दाब दिला जातो. यामध्ये एका मिनीटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा दाब दिला जातो.