Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Colloid’ in Marathi
‘Colloid’ चा मराठी अर्थ
शब्द: Colloid
उच्चार: कोलॉइड
अर्थ: कलिल, कलिल प्रकारचे मिश्रण
अधिक माहिती: द्रव आणि स्थायूकण (ज्यांचा व्यास 10ˉ⁵ मीटर च्या जवळपास असतो) यांच्या विषमांगी मिश्रणाला colloid किंवा कलिल असे म्हणतात. कलिलातील स्थायूकणांचा व्यास 10ˉ⁵ मीटर च्या जवळपास असतो. यातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जाऊ शकतो व काही प्रमाणात प्रकाशाचे अपस्करण होते. कलिलातील कण सहसा गाळून वेगळे करता येत नाहित. उदा. दूध. दुधामध्ये पाणी ह्या माध्यमात प्रथिने, स्निग्ध पदार्थ इत्यादींचे स्थायूकण समांगी विखुरलेले असतात व त्यांचा व्यास 10ˉ⁵ मीटर च्या आसपास असतो.