Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Chemical formula’ in Marathi
‘Chemical formula’ चा मराठी अर्थ
शब्द: Chemical formula
उच्चार: केमिकल फॉर्म्युला
अर्थ: रेणुसूत्र, रासायनिक सूत्र, विशिष्ट रसायनाच्याएका रेणूचे संघटन दर्शवणारे सूत्र
अधिक माहिती: संयुगामध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते. संयुगाच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणू विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणू आहेत ते रेणुसूत्राच्या साहाय्याने दर्शवले जाते. रासायनिक सूत्रामधे त्या रेणूमधे असलेल्या सर्व मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या त्या मूलद्रव्याच्या चिन्हा नंतर पायाशी अधोलिपीमधे लिहिले जाते. उदा. H₂O (पाणी), CH₄ (मिथेन), C₆H₁₂O₆ (ग्लुकोज) इ.