Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Changes in the ovary during menstrual cycle’ in Marathi
‘Changes in the ovary during menstrual cycle’ चा मराठी अर्थ
शब्द: Changes in the ovary during menstrual cycle
उच्चार: चेंजेस इन द ओव्हरी ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन
अर्थ: मासिक पाळीच्या काळात अंडाशयात होणारे बदल
अधिक माहिती: ओव्हरी (अंडाशय) मधे असलेल्या असंख्य फॉलिकल (पुटीका) पैकी एका पुटीकेचा व त्यातील ऊसाइट (अंडपेशी/ डिंबपेशी) चा ‘पुटीका ग्रंथी संप्रेरक’ (Follicle stimulating hormone) च्या प्रभावामुळे विकास होण्यास सुरूवात होते. ही विकसनशील पुटिका ‘इस्ट्रोजेन’ हे संप्रेरक स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशय (युटेरस) च्या अंतःस्तराची (एन्डोमेट्रिअमची) पुनर्निमिती होते. ओव्हरी (अंडाशय) मधे वाढणाऱ्या फॉलिकल (पुटिका) ची वाढ पूर्ण झाल्यानंतर ‘पितपिंडकारी संप्रेरक’ (Luteinizing hormone) च्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका (फॉलिकल) फुटते व त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. याला ओव्ह्युलेशन (अंडमोचन) असे म्हणतात. अंडाशयामध्ये राहिलेल्या फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड (Corpus luteum) तयार होते. हे पितपिंड ‘प्रोजेस्टेरॉन संप्रेरक’ स्त्रवण्यास सुरुवात करते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील (एन्डोमेट्रिअमच्या) ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते एन्डोमेट्रिअमची ही स्थिती गर्भाच्या रोपणासाठी आवश्यक असते.