Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Centrifuge’ in Marathi
‘Centrifuge’ चा मराठी अर्थ
शब्द: Centrifuge
उच्चार: सेंट्रिफ्युज
अर्थ: अपकेंद्री,
अधिक माहिती: वेगवेगळ्या घनतेच्या पदार्थांच्या मिश्रणातून पदार्थ वेगळे करण्यासाठी अपकेंद्री वापरली जाते. अपकेंद्री यंत्रातील मिश्रण भरलेल्या नळ्या वेगाने वर्तुळाकार फिरत असताना त्यातील मिश्रणातील कणांवर वर्तुळकेंद्रापासून दूर ढकलणारे बल (अपकेंद्री बल) निर्माण होते. जास्त घनतेच्या कणांवर हे बल त्याच प्रमाणात जास्त असते. त्यामुळे मिश्रणांतील स्थायू कण किंवा जास्त घनतेचे कण तळाशी जमा होऊन द्रवापासून वेगळे होतात.