Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Cellular organization’ in Marathi
‘Cellular organization’ चा मराठी अर्थ
शब्द: Cellular organization
उच्चार: सेल्युलर ऑर्गनायझेशन
अर्थ: पेशीमय रचना
अधिक माहिती: सजीवांचे शरीर हे पेशी या एककाच्या स्वरुपात बनलेले असते. या पेशी म्हणजे लहान लहान कप्पे असतात ज्यांच्या आत विविध जैवरासयनिक प्रक्रिया चालू असतात. पेशींचे विभाजन व विशेषीकरणाने बहुपेशीय सजीवांचे शरीर बनते. बहुपेशीय सजीवांच्या पेशींनी बनलेल्यअशा संरचनेला cellular organization किंवा पेशीमय रचना असे म्हणतात.