Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Catabolism’ in Marathi
‘Catabolism’ चा मराठी अर्थ
शब्द: Catabolism
उच्चार: कॅटाबोलिझम
अर्थ: रेणू तोडणे, रेणूचे विघटन करणे
अधिक माहिती: Catabolism म्हणजे जटील रेणू तोडणे व त्याचे रुपांतर साध्या घटकांमाधे करणे किंवा टाकाऊ रेणू नष्ट करणे. कॅटाबोलिक क्रियांमधे जटिल रेणू तोडून घटक रेणू मिळवले जातात किंवा रेणूचे विघटन केले जाते. उर्जानिर्मितीसाठीच्या रासायनिक अभिक्रिया या कॅटाबॉलिक प्रकारच्या असतात. उदा. ग्लुकोजचे विघटन करून उर्जा मिळवणे (ग्लायकॉलिसिस, टिसीए सायकल), अनावश्यक प्रथिनं किंवा हानिकारक विषारी पदार्थ नष्ट करणे इ.