Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Carbon-14 (C-14)’ in Marathi
‘Carbon-14 (C-14)’ चा मराठी अर्थ
शब्द: Carbon-14 (C-14)
उच्चार: कार्बन – 14
अर्थ: कार्बन – 14, कार्बनचे किरणोत्सारी समस्थानिक ज्याचा अणुवस्तुमानांक 14 आहे
अधिक माहिती: कार्बनचे किरणोत्सारी समस्थानिक ज्याचा अणुवस्तुमानांक 14 आहे. मृत जैविक अवशेषांमधील कार्बन -14 व कार्बन -12 च्या तुलनात्मक प्रमाणाचा उपयोग ते अवशेष किती पुरातन आहेत याचा अंदाज लावण्यासाठीच्या वैज्ञानिक पद्धतीत केला जातो. कार्बन -14 चे अर्ध-आयुष्य 5730 वर्षे इतके आहे.