Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Carat (Gold)’ in Marathi
‘Carat (Gold)’ चा मराठी अर्थ
शब्द: Carat (Gold)
उच्चार: कॅरेट
अर्थ: कॅरेट, सोन्याची शुद्धता दर्शविण्याचे एकक
अधिक माहिती: 24 कॅरेट सोने म्हणजे 100% शुद्ध सोने असते. 100% शुद्ध सोने मऊ असते. त्यामुळे शुद्ध सोन्याचे तयार केलेले दागिने दाबामुळे वाकतात किंवा तुटतात. म्हणून सोन्यात तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळली जाते. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरले जाते. सोन्यातील शूद्धतेचे प्रमाण 24 पैकी कीती भाग सोने आहे याच्या टक्केवारीने दर्शवले जाते. उदा. 22 कॅरेट सोने म्हणजे 91.66% शुद्ध सोने असते. [(22/24)x100 = 91.66%]. त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोने म्हणजे 75% शुद्ध सोने, 14 कॅरेट सोने म्हणजे 58.33% शुद्ध सोने, 12 कॅरेट सोने म्हणजे 50% शुद्ध सोने, 41.66 कॅरेट सोने म्हणजे 10% शुद्ध सोने.