Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Calotropis’ in Marathi
‘Calotropis’ चा मराठी अर्थ
शब्द: Calotropis
उच्चार: कॅलोट्रॉपिस
अर्थ: रुई वनस्पती
अधिक माहिती: Calotropis म्हणजे रुई वनस्पती ही माळरानावर रस्त्यांच्या कडेला आढळते. पाने तळहाताएवढी मोठी, मांसल व लंबवर्तुळाकार असतात. पाने तोडल्यास पांढरा चीक बाहेर पडतो. फळ अंब्याएवढ्या आकाराचे असते. वाळल्यावर फुटते व त्यातुन गोलाकार कापसासारखे पांढरे केस असलेले असंख्य बीज हवेमधे उडतात.