Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Bohr’s stable orbit atomic model’ in Marathi
‘Bohr’s stable orbit atomic model’ चा मराठी अर्थ
शब्द: Bohr’s stable orbit atomic model
उच्चार: बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल
अर्थ: बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप
अधिक माहिती: अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या विविध समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. प्रत्येक कक्षेची व त्या कक्षेत असणार्या इलेक्ट्रॉनची विशिष्ट उर्जापातळी असते. बाहेरील कक्षेची उर्जापातळी आतील कक्षेच्या उर्जापातळीपेक्षा जास्त असते. विशिष्ट कक्षेत विशिष्ट संख्येइतकेच इलेक्ट्रॉन असू शकतात. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. एखाद्या कक्षेत जागा रिकामी असेल तर इलेक्ट्रॉन कक्षा बदलू शकतो. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना त्या कक्षाच्या उर्जापातळीतील फरकाइतकी ऊर्जा शोषून घेतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना उर्जापातळीतील फरकाइतकी ऊर्जा बाहेर उत्सर्जित करतो.