Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘BODMAS’ in Marathi
‘BODMAS’ चा मराठी अर्थ
शब्द: BODMAS
उच्चार: बोडमास
अर्थ: कंचेभागुबेव, पदावली सोडवण्याच्या नियमांचे संक्षिप्त रुप
अधिक माहिती: बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या चिन्हांचा वापर करून लिहिलेली संख्यांची मांडणी म्हणजे expression किंवा पदावली असते. उदा. 72 ÷ 6 + 2 × 2 = 16. पदावलीचे योग्य उत्तर मिळ्ण्याकरिता काही नियम पाळावे लागतात संक्षिप्त रुपात लक्षात टेवण्यासाठी त्यां नियमांना BODMAS किंवा कंचेभागुबेव असे म्हणतात. B/कं = Bracket/कंस, O/चे =Of/चा,ची,चे, D/भा =Division/भागाकार, M/गु =Multiplication/गुणाकार, A/बे =Addition/बेरीज, S/व = Subtraction/ वजाबाकी, या क्रमाने गणिती प्रक्रिया कराव्यात असा नियम आहे.