Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Blood pressure’ in Marathi
‘Blood pressure’ चा मराठी अर्थ
शब्द: Blood pressure
उच्चार: ब्लड प्रेशर
अर्थ: रक्तदाब
अधिक माहिती: शरीरातील रक्तवाहिन्यांतील (धमन्या व शिरा) रक्त हे हृदयाच्या आकुंचनप्रसरणामुळे प्रवाहित ठेवले जाते. हृदयाच्या जोरदार आकुंचनामुळे ढकलल्या गेलेल्या रक्ताचा दाब धमन्यांच्या भिंतीवर पडतो त्याला Blood pressure किंवा ‘रक्तदाब’असे म्हणतात. योग्य रक्तदाब राखणे हे शरीराच्या सर्व भागांत रक्त पोहोचण्यासाठी आवश्यक असते. रक्तदाब मोजण्यासाठी ‘स्पिग्मोमॅनोमीटर’नावाचे उपकरण वापरले जाते. त्यामधे रक्तदाब हा मर्क्युरी (पारा) च्या स्तंभाच्या मीलीमीटर उचीएवढा नोंदला जातो. हृदयाचे आकुंचन होते त्यावेळी जो दाब नोंदविला जातो त्यास ‘सिस्टॉलिक दाब’(अकुंचक दाब) असे म्हणतात व प्रसरणाच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबाला ‘डायस्टोलिक दाब’(प्रकुंचनीय दाब) असे म्हणतात. रक्तदाब हा या दोन दाबांच्या जोडीच्या स्वरूपात (सिस्टॉलिक दाब/ डायस्टोलिक दाब मीमी) व्यक्त केला जातो. निरोगी व्यक्तीचा रक्तदाब सुमारे 120/80 मिमी ते 139/89 मिमी मर्क्युरीच्या (पाऱ्याच्या) स्तंभाएवढा असतो.