Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Blood cells’ in Marathi
‘Blood cells’ चा मराठी अर्थ
शब्द: Blood cells
उच्चार: ब्लड सेल्स
अर्थ: रक्तपेशी, रक्तामधे आढळणार्या पेशी
अधिक माहिती: मानवी रक्तामधे तांबड्या रक्तपेशी, श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) व रक्तपट्टीका (प्लेटलेट्स) या पेशी आढळतात. तांबड्या रक्तपेशी ऑक्सिजन व कार्बनडायऑक्साइड चे वहन करण्याचे कार्य करतात. रक्तामधे पांढर्या रक्तपेशी व रक्तपट्टीका (प्लेटलेट्स) सुद्धा असतात, त्यांचे कार्य रोगप्रतिकारसंस्थेशी निगडीत असते. शरीरात रोगजंतूचा शिरकाव झाल्यास पांढर्या रक्तपेशी त्यावर हल्ला करतात व त्यांना नष्ट करतात. रक्तपट्टीका (प्लेटलेट्स) या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.