Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Blood’ in Marathi
‘Blood’ चा मराठी अर्थ
शब्द: Blood
उच्चार: ब्लड
अर्थ: रक्त
अधिक माहिती: रक्त हा प्राण्यांच्या शरीरात आढळणारा प्रवाही द्रवपदार्थ आहे जो प्राणीशरीरात पोषकद्रव्ये, प्राणवायू, संप्रेरके इ. चे वहन करण्याचे कार्य करतो. रक्तामधे रक्तद्रव (प्लाझ्मा) व रक्तपेशी (ब्लड सेल्स) हे मुख्य भाग असतात. मानवी रक्त हे त्यात असणार्या ऑक्सिजनयुक्त तांबड्या रक्तपेशींमुळे लाल रंगाचे असते. तांबड्या रक्तपेशी ऑक्सिजन व कार्बनडायऑक्साइड चे वहन करण्याचे कार्य करतात. रक्तामधे पांढर्या रक्तपेशी व रक्तपट्टीका (प्लेटलेट्स) सुद्धा असतात, त्यांचे कार्य रोगप्रतिकारसंस्थेशी निगडीत असते. रक्तद्रव (प्लाझ्मा) हे फिकट पिवळ्या रंगाचे असून त्यात पाणी, प्रथिने, क्षार व विविध जैवरासायनिक घटक असतात. रक्ताचा सामू (pH) 7.4 असतो. रक्त हा द्रायू संयोगी ऊती (फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू) आहे.