Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Biodiversity’ in Marathi
‘Biodiversity’ चा मराठी अर्थ
शब्द: Biodiversity
उच्चार: बायोडायव्हर्सिटी
अर्थ: जैवविविधता
अधिक माहिती: Biodiversity म्हणजे एखाद्या इकॉसिस्टिम मधे आढळणाऱ्या सजीवांमधील विविधतेचे प्रमाण. उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या शेतात गेला त तर तिथे लावलेले पीक ही एकच वनस्पती असेल व शिवाय काही गवत व तण असेल. मात्र तुम्ही एखाद्या नैसर्गिक जंगलात गेलात तर तुम्हाला शेकडो प्रकारच्या वनस्पती, प्राणी, कीटक यांचे विविध प्रकार आढळतील. म्हणजेच जंगलामधे Biodiversity म्हणजे जैवविविधता जास्त आढळते. पृथ्वीवरील सजीवांमधील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी आणि पृथ्वीवरील सजीवांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी बायोडायव्हर्सिटी चा अभ्यास करणे आवश्यक आहे.