Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Atomic Subshell’ in Marathi
‘Atomic Subshell’ चा मराठी अर्थ
शब्द: Atomic Subshell
उच्चार: ॲटॉमिक सबशेल
अर्थ: इलेक्ट्रॉन उपकवच, अणुमधील इलेक्ट्रॉनचा केंद्रकाभोवतीच्या मुख्य कवचाअंतर्गत कक्षाकार भ्रमणमार्ग, मुख्य कवचांच्या अंतर्गत असलेले s, p, d, f हे उपकवच
अधिक माहिती: अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉन हे विविध उर्जापातळीच्या कवचांमधे परिभ्रमण करत असतात. या कवचांना त्यांच्या क्रमांकांनुसार K,L,M,N इ. संज्ञा वापरल्या जातात व त्या कवचांमधील जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची संख्या ही त्या कवचाच्या क्रमांकानुसार 2n² या सूत्रानुसार मिळालेल्या संख्येइतकी असते. (n = कवचाचा क्रमांक). (कवचातील इलेक्ट्रॉनची जास्तीतजास्त संख्या- K=2, L= 8, M=18, N=32 इ.) या प्रत्येक मुख्य कवचांच्या अंतर्गत विविध उपकवच देखील असतात. या उपकवचांना s, p, d, f या चिन्हानी दर्शवितात. या उपकवचांची देखील जास्तीत जास्तइलेक्ट्रॉन धारण क्षमता असते उदा. s = 2, p = 6, d = 10, f = 14.