Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Atomic shell’ in Marathi
‘Atomic shell’ चा मराठी अर्थ
शब्द: Atomic shell
उच्चार: ॲटॉमिक शेल
अर्थ: इलेक्ट्रॉन कवच, अणुमधील इलेक्ट्रॉनचा केंद्रकाभोवतीचा कवचाकार भ्रमणमार्ग, अणुमधील K, L, M, N हे मुख्य कवच
अधिक माहिती: अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. भ्रमणकक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने ‘कक्षा’ (orbit) ह्या संज्ञे ऐवजी ‘कवच’ (shell) ही संज्ञा वापरतात. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्या कवचाच्या उर्जापातळीवरून ठरते.