Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Atomic nucleus’ in Marathi
‘Atomic nucleus’ चा मराठी अर्थ
शब्द: Atomic nucleus
उच्चार: ॲटॉमिक न्युक्लिअस
अर्थ: अणूचे केंद्रक
अधिक माहिती: अणूचे केंद्रक धन (+) प्रभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. केंद्रकामधे मुख्य दोन प्रकारचे अवअणुकण असतात. केंद्रकातील अवअणुकणांना न्युक्लिऑन असे म्हणतात. प्राेटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लिऑनचे दोन प्रकार आहेत. प्रोटॉन हे धन (+) प्रभारित असते तर न्युट्रॉन वर कुठलाही प्रभार नसतो. अणुकेंद्रकामधे याशिवाय इतरही प्रकारचे अवअणुकण असतात.