Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Archemedes Principle’ in Marathi
‘Archemedes Principle’ चा मराठी अर्थ
शब्द: Archemedes Principle
उच्चार: आर्किमिडीज प्रिंसिपल
अर्थ: आर्किमिडीजचे तत्त्व
अधिक माहिती: आर्किमिडिजचे तत्व सांगते की एखादी वस्तू द्रायूमध्ये (द्रव किंवा वायूमधे) अंशत: किंवा पूर्णतः बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या/हटवलेल्या द्रायूच्या वजनाइतके असते. आर्किमिडिजचे तत्त्व जहाजे, पाणबुड्या यांची रचना करण्यासाठी उपयुक्त असते. ‘दुग्धतामापी’ व ‘आर्द्रतामापी’ ही उपकरणे आर्किमिडिजच्या तत्त्वावर आधारित आहेत.अशी कथा सांगितली जाते की, आर्किमिडिज हे आघोळ करण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना वरील तत्त्वाचा शोध लागला. ‘युरेका, युरेका’ म्हणजे ‘मला सापडले, मला सापडले’ असे ओरडत ते त्याच नागड्या अवस्थेत रस्त्यावर धावले होते.