Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Anomalous behaviour of water’ in Marathi
‘Anomalous behaviour of water’ चा मराठी अर्थ
शब्द: Anomalous behaviour of water
उच्चार: ॲनोमॅलस बिहेव्हिअर ऑफ वॉटर
अर्थ: पाण्याचे असंगत वर्तन
अधिक माहिती: पाण्याचे तापमान जसे जसे कमी होत जाते तसे तसे इतर द्रवांप्रमाणे त्याची घनता वाढत जाते. मात्र 4 ° C तापमानापेक्षा कमी तापमान झाल्यावर मात्र पाण्याची घनता वाढण्याएवजी कमी होऊ लागते. याचा अर्थ 4° C तापमानाला पाण्याची घनता सर्वांत जास्त असते. पाण्याचे तापमान 4 ° C पेक्षा कमी झाल्यास त्याची घनता कमी होते व आकारमान वाढते म्हणजेच पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात. पाण्याच्या या असंगत वर्तनामूळेच बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते व त्यामुळेच द्रव पाण्यावर बर्फ तरंगतो.