Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Angioplasty’ in Marathi
‘Angioplasty’ चा मराठी अर्थ
शब्द: Angioplasty
उच्चार: ॲंजिओप्लास्टी
अर्थ: हृदयातील रक्तवाहिन्यात असलेला अडथळा दूर करण्याची शस्त्रक्रिया
अधिक माहिती: या शस्त्रक्रियेत हृदयाच्या रक्तवाहिन्यामधे निर्माण झालेला अडथळा काडून रक्तप्रवाह सुरळीत केला जातो. त्यासाठी हृदयातील रक्तवाहीनीमधे फुग्यासारखे टोक असलेली बारीक नळी घुसवली जाते. नळीचे टोक अडथळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर टोकावरील फुगा फुगवला जातो व अडथळा काढून टाकला जातो. काही वेळा अडथळ्याच्या जागी एक आखुड तारेची जाळीदार नळी (स्टेंट) कायमस्वरूपी बसवली जाते ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो.