Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Alveoli’ in Marathi
‘Alveoli’ चा मराठी अर्थ
शब्द: Alveoli
उच्चार: आल्व्हिओली
अर्थ: वायुकोश
अधिक माहिती: फुप्फुसांमधे वायूनलिका ही झाडाच्या फांद्यांप्रमाणे विभाजीत होत जात व सर्वात शेवटी टोकाला गोलाकार लहान वायूपोकळी बनवतात. त्यांना alvioli किंवा वायुकोश असे म्हणतात. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असते. या केशवाहिन्यांतून वाहणारे रक्त व वायुकोशातील हवा यांच्यादरम्यान वायंची देवाणघेवाण होते. ऑक्सिजन रक्तात शोषला जातो व कार्बनडाय ऑक्साइड रक्तातून बाहेर सोडला जातो यालाच बाह्यश्वसन असे म्हणतात.