Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Acquired Immuno Deficiency Syndrome (AIDS)’ in Marathi
‘Acquired Immuno Deficiency Syndrome (AIDS)’ चा मराठी अर्थ
शब्द: Acquired Immuno Deficiency Syndrome (AIDS)
उच्चार: ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशिएंसी सिंड्रोम (एड्स)
अर्थ: एड्स, एचआयव्ही विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक्षमतेतील कमतरता
अधिक माहिती: एड्स हा रोग मानवाला एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशिएन्सी व्हायरस) या विषाणूसंसर्गामुळे निर्माण झालेल्या रोगलक्षणांचा समूह आहे. यामध्ये एचआयव्ही विषाणू हे मानवी रक्तातील पांढर्या रक्तपेशी (CD4⁺ T-cell) चा स्वतःच्या वाढीसाठी वापर करतात. त्यामुळे पांढर्या रक्तपेशींची संख्या कमी होते. रक्तातील पांढर्या रक्तपेशी या रोगप्रतिकार संस्थेचा भाग असतात, त्यांची संख्या कमी झाल्यामुळे मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती दुर्बल होते त्यामुळे एचआयव्ही बाधित व्यक्तीला विविध रोगांची सहज लागण होते. एचआयव्ही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर काही कालावधीने रुग्णामधे एड्स ची लक्षणे दिसून येतात. एचआयव्ही विषाणूचा प्रसार असुरक्षित लैंगिक संबंधांतून (लैंगिक स्त्राव जसे की वीर्य, योनीस्राव) किंवा संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या रक्तासह संबंध आल्याने होतो. वजन कमी होणे, ताप, रात्री घाम येणे, थकवा आणि वारंवार जंतुसंसर्ग होणे ही एड्स ची लक्षणे आहेत.