Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Acid Rain’ in Marathi
‘Acid Rain’ चा मराठी अर्थ
शब्द: Acid Rain
उच्चार: ॲसिड रेन
अर्थ: आम्लवर्षा, आम्लयुक्त पाऊस
अधिक माहिती: प्रदूषणकारक सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे (ज्वलनाद्वारे ऑक्सिजनसोबत बनलेली संयुगे) ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फुरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रीक आम्ल तयार होते. ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच Acid rain किंवा आम्लवर्षा असे म्हणतात. कोळसा, लाकूड, खनिज तेले यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून हे वायू वातावरणात सोडले जातात. आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते त्यामुळे वनस्पती व जलचरांवर वाईट परिणाम होतो. तसेच इमारती व धातूच्या वस्तूंचे क्षरण होते.