Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ’22 carat’ in Marathi
’22 carat’ चा मराठी अर्थ
शब्द: 22 carat
उच्चार: ट्वेंटीटू कॅरेट
अर्थ: बावीस कॅरेट, 91.66% शुद्ध
अधिक माहिती: सोन्याची शुद्धता दर्शविण्याचे एकक. 22 कॅरेट सोने म्हणजे 91.66% शुद्ध सोने असते. [(22/24)x100 = 91.66%]. 100% शुद्ध सोने मऊ असते. त्यामुळे शुद्ध सोन्याचे तयार केलेले दागिने दाबामुळे वाकतात किंवा तुटतात. म्हणून सोन्यात तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळली जाते. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरले जाते.